Nanded: भाऊराव साखर कारखान्याची 6 कोटींची फसवणूक; तिघांना अटक संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded: भाऊराव साखर कारखान्याची 6 कोटींची फसवणूक; तिघांना अटक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मालकीची असलेल्या भाऊराव साखर कारखान्याला एका चेन्नईच्या कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

संतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या मालकीची असलेल्या भाऊराव साखर कारखान्याला एका चेन्नईच्या Chennai कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी चेन्नईच्या दोघांसह तीन जणांविरोधात बारड पोलिस ठाण्यात Police Station फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक ही करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

भाऊराव साखर कारखान्याचे हदगाव युनिट - 3 आणि वाघलवाडा येथील - 4 च्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नई च्या एका कंपनीने घेतले. साखर निर्यात केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केंद्र शासनाकडून प्रतिटन कारखान्याला मदत मिळते. मात्र, चेन्नईच्या कंपनीने कुठलेही कागदपत्रे सादर न करता इंडोनेशिया देशाने तूमची साखर नाकारली असल्याचे सांगितले आणि यासंदर्भातला कुठलाही पत्रव्यवहार भाऊराव साखर कारखान्याला दिला नाही.

त्यामुळे अहमदनगरचे अभिजित देशमुख, चेन्नईचे प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. काल या तिन्ही आरोपींना न्यायालयाने चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण च्या साखर कारखान्याच्या कंपनीची फसवणुक झाल्याचे प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ICC Player of the Month: आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर टीम इंडियाची छाप; शुभमन गिल आणि शेफाली वर्माची निवड

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

SCROLL FOR NEXT