भाऊराव कारखान्याने शेअर्स ऐवजी सभासदांची संख्या वाढून भांडवल उभे करावे - प्रल्हाद इंगोले  संतोष जोशी
महाराष्ट्र

भाऊराव कारखान्याने शेअर्स ऐवजी सभासदांची संख्या वाढून भांडवल उभे करावे - प्रल्हाद इंगोले

सभासदांवर आर्थिक बोजा न टाकता नविन सभासद (नियमित ऊस पुरवणारे सभासद) करून भागभांडवल जमा करावे अशी मागणी शिवसेनेचे नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली.

संतोष जोशी

नांदेड - भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने sugarfactory शेअर्सची किंमत न वाढवता तसेच सभासदांवर members आर्थिक बोजा न टाकता नविन सभासद (नियमित ऊस पुरवणारे सभासद) करून भागभांडवल जमा करावे अशी मागणी शिवसेनेचे shivsena नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केली. Bhaurao factory should raise capital by increasing the number of members instead of shares

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना स्थापन करतेवेळेस काही कारणांमुळे मुख्य प्रवर्तक अशोकराव चव्हाण यांना अनेक गावातील लोकांना सभासद करून घेता आले नव्हते त्यामुळे लहान, पारडी, शेलगाव यासह अनेक गावांतील विश्वासू कार्यकर्तेही वर्षांनुवर्षांपासून नाराज आहेत. आता सध्या कारखान्याला आर्थिक भांडवल भाग भांडवलाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने दहा हजारांवरुन पंधरा हजारांवर कारखान्याचा शेअर्स करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. एक तर दोन कारखाने विकूनही यावर्षी अगोदरच पूर्ण एफआरपी दिली नाहीच शिवाय त्यातच पुन्हा पाच हजार रूपये जास्तीचे द्यायचे म्हणले तर ते कुठून द्यायचे असा प्रश्न सभासदांना पडला आहे.

त्यामुळे कारखाना प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा तसेच पालकमंत्री अशोकराव चव्हाणांनी ashok chavhanनियमित ऊस पुरवठा करणारे शेतकरी, सभासद न करून घेतलेले शेतकरी यांना नवीन सभासद करून घ्यावे व भागभांडवल उभे करावे असे झाल्यास शेतकरीही मोठय़ा आनंदाने भागभांडवल जमा करतील व जुन्या सभासदावर आर्थिक बोजा पडणार नाही.

म्हणून कारखाना प्रशासनाने आर्थिक संकटाच्या काळात जुन्या सभासदांवरती आर्थिक बोजा न टाकता नवीन लोकांना सभासद करून घेतल्यास राहिलेल्या लोकांनाही कारखाना व साहेब आपले वाटतील आणि आर्थिक भांडवली जमा होईल.

अशोक चव्हाण यांनी याबाबत लोकभावनेचा विचार करावा व नवीन लोकांना कारखान्याचे सभासद होण्याची संधी द्यावी अशीही मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले pralhad ingole यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT