narayan rane bhaskar jadhav
narayan rane bhaskar jadhav 
महाराष्ट्र

दादा, राणेंना अटक हाेऊ शकते!

अमोल कलये

रत्नागिरी : कायद्यापेक्षा काेणीही माेठा नाही. त्यामुळे राणेंना अटक हाेऊ शकते असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. पाेलिस राणेंना अटक करु शकतात. संबंधित सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींना त्याची माहिती कळविणे गरजेचे असते. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे लक्षात घ्यावे असेही जाधव यांनी नमूद केले. दरम्यान घटनेत सर्वांना नियम, कायदे हक्क सारखे आहेत. राणे जरी म्हणत असतील मी काय नाॅर्मल माणूस आहे का ? तर ते कायद्यापेक्षा माेठे नाहीत एवढचं सांगताे narayan rane bhaskar jadhav.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांच्या टीकेवरुन राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही भागात राणेंवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, तर काही भागात त्यांच्या निषेर्धात फलक लावण्यात येत आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे हे कायद्या पेक्षा माेठे नसल्याने त्यांना अटक हाेऊ शकते असा दावा केला.

राणेंच्या मुलांनी केलेल्या टीकेवर आमदार जाधव यांनी मी काेणा लल्लू पल्लूच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मोकळा नाही असे म्हणत नितेश राणे यांच्या ट्वीट्वर जाधव म्हणाले आमच्याकडे कोंबड्यांचा खूराडा असतो आणि या खुराड्यात येण्याचे धाडस करू नका असे त्यांना म्हणायचे असेल असा प्रतिहल्ला भास्कर जाधव यांनी राणे पुत्रांवर चढवला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

Today's Marathi News Live : आजारपणात नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना फोन करून विचारपूस करायचे; देवेंद्र फडणवीस

Food for Thyroid: आहारात 'या' पोषक घटकांचा समावेश केल्यास थायरॉईडची समस्या होईल दूर

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांनी केला प्रवाशाचा चाकूने भोसकून खून

Navi Mumbai BJP News | नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?

SCROLL FOR NEXT