Bhaskar Jadhav , Sindhudurg ,  Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg News: भास्कर जाधवांच्या अडचणीत वाढ, पोलीस घरी पोहोचले

कुडाळमधील शिवसेनेच्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधवांना नोटीस बजावली आहे. कुडाळमधील शिवसेनेच्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी जात 41(अ)अन्वये नोटीस बजावली आहे. तपासकार्यात सहकार्य करावे, नोटीस मधील नमूद अटी -शर्थीचे पालन करावे, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. (Latest News)

भाजपा नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्यावर केला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात केली.

आमदार भास्कर जाधव यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Mumbai Pune : मुंबई-पुणे महामार्गावर भयंकर अपघात, २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Sukanya Samruddhi Yojana: मुलींसाठी सरकारची खास योजना! महिन्याला २९१६ रुपये गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

Tuesday Astro Remedies: दर मंगळवारी करा 'ही' 5 कामं; हनुमानाच्या कृपेने सर्व गोष्टी घडतील मनासारख्या

Navratri 2025 : नवरात्रीत देवीला दाखवा 'हा' खास नैवेद्य, अननसापासून बनवा युनिक स्वीट डिश

SCROLL FOR NEXT