बगदादमधील फुटबॉल स्टेडियमजवळ भीषण स्फोट, 10 ठार तर 20 हून अधिक जखमी

मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
File Photo
File PhotoSaam Tv

Baghdad Explosion Near Football Stadium : इराकची राजधानी बगदादमध्ये फुटबॉल स्टेडियमजवळ स्फोट झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या लोकांचा समावेश आहे. (Iraq Bomb Blast)

File Photo
Wardha Crime News : दारुविक्रेत्याचा पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमजवळ असलेल्या गॅस टँकरमध्ये हा स्फोट झाला.स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचेला तडे गेले आहे. तसेच घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा होणार असल्याची ग्वाही अब्दुल लतीफ रशीद यांनी दिली.

सोमालियाच्या राजधानीत दोन स्फोट, अनेकांचा मृत्यू

तर सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी एका प्रमुख सरकारी कार्यालयाजवळ गर्दीच्या ठिकाणी दोन स्फोट झाले, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी सुद्धा झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com