Maratha Reservation  Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न; शिंदेंच्या आमदाराचा राज ठाकरेंवर बाण

raj thackeray vs bharat gogawale : राज ठाकरे महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भरत गोगावले यांनी केली. राज ठाकरेंच्या टीकेला गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Vishal Gangurde

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर मराठा आरक्षणावरून टीका

भरत गोगावले यांंचं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

महायुती एकत्र असून कोणीही भिती निर्माण करू नये, अशी शिंदे गटाकडून भूमिका

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मराठा आरक्षणावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांच्या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात शिंदेंचे आमदार, मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री गोगावले म्हणाले, 'महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 4 महिन्यांची मुदत दिली होती'.

'मनोज जरांगे त्यामुळे आले आहेत. यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नाही. पण त्यांना एकनाथ शिंदे यांनी मोर्चा काढायला लावला असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे असा विचार करणार नाहीत, असे गोगावले पुढे म्हणाले.

शंभूराज देसाई यांची शरद पवारांवर टीका

'तामिळनाडूमध्ये 72 टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली. ' उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 ते 2022 साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवारांनी मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का सांगितला नाही. उद्धव ठाकरे हे शरद पवारांना विचारल्याशिवाय तेव्हा काहीच करत नव्हते, असे देसाई म्हणाले.

'शरद पवार जे आता सांगताय, तेव्हाच ते राज्य सरकारला सांगून उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच केंद्राला अशी विनंती केली असती, तर केंद्राने तेव्हा निर्णय काय घ्यायचा तो घेतला असता. मात्र आता ते ही भूमिका घेत आहेत बघूया. आता याच्यापुढे काय होतंय, असा प्रतिसवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे मराठा आरक्षणावर म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबतची प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देतील. जरांगे परत आल्याचंही उत्तर तेच देऊ शकतील. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. मागच्यावेळी जरांगे पाटील मुंबईकडे येताना एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवला. मग हे परत का आले?'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Laxman Hake: अंगावर धावून आले आणि मारण्याचा प्रयत्न केला.." पाहा लक्ष्मण हाकेंसोबत नेमकं काय घडलं|VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी सुरू

Monday Horoscope : गौरी-गणपतीत उजळणार नशीब, ५ राशींच्या हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT