maharashtra politics saam tv
महाराष्ट्र

'विधानसभेसाठी अघोरी पूजा'

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आमदार भरत गोगावलेंनी केलेल्या एका अघोरी पूजेचा व्हिडीओच ठाकरे गटाने पोस्ट केलाय... मात्र ही पूजा कशासाठी केली गेली.?.ती कोणत्या देवीची होती? आणि त्यावर गोगावलेंनी काय प्रतिक्रीया दिलीय? पाहूयात...

Omkar Sonawane

ॐ ह्लीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय बुद्धिम विनाशाय ह्लीं ॐ नम:

हा व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी भरत गोगावलेंना घेरलंय.. मंत्री भरत गोगावलेंनी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी थेट मध्य प्रदेशमधील उज्जैनमधून पुजाऱ्यांना बोलावत अघोरी पूजा केल्याचा गंभीर आरोप वसंत मोरेंनी केलाय..

खरंतर शिवसेना फुटीला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिलीय.. त्यामुळे ठाकरे गटाने भरत गोगावलेंना कोंडीत पकडण्याची 17 ऑक्टोबर 2024 ला बगलामुखी देवीची घातलेली पूजा उकरुन काढण्यात आलीय.... तर वसंत मोरेंच्या दाव्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीही गोगावलेंच्या विरोधात मैदानात उतरलीय...

विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले यांच्यात जोरदार लढत झाली... यात भरत गोगावलेंनी 26 हजार मतांनी विजय मिळवला.... त्यामुळे अघोरी पूजेचा आरोप फेटाळून लावतानाच गोगावलेंनी आपल्या कामामुळेच विजय मिळाल्याचा दावा केलाय....

दरम्यान यापूर्वी ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही अघोरी पुजेचे आरोप केले होते. 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला... खरंतर राजकीय नेत्यांकडे पाहून समाज भूमिका घेत असतो.. राजकीय नेत्यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकण्यापेक्षा विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे, असा सर्वत्र सूर उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT