Bhandara Crime News भूषण शिंदे
महाराष्ट्र

Bhandara:सामुहिक अत्याचार प्रकरणी पीडितेच्या न्यायासाठी शिवसेना मैदानात; विशेष महानिरीक्षकांची घेतली भेट

Bhandara Crime News : नागपूर-गडचिरोली विभागाचे विशेष महानिरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासण्यासंदर्भात निवेदन दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

भंडारा: भंडारा (Bhandara) जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर मदतीच्या बहाण्याने तिघांनी सामुहिक (Sexual Assault) अत्याचार करुन तिली निर्वस्त्र अवस्थेत तिला रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना 5 ऑगस्टला उघडकीस आली होती. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या आणि घरगुती भांडणातून माहेरी बहिणीसोबत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला भंडारा जिल्ह्यातील कारधा जंगलात नेऊन तिघांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी शिवसेनेच्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाने पीडितेची भेट घेऊन याप्रकरणाची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Bhandara Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला अत्याचारामुळे व प्रचंड रक्तस्राव झाल्याने बेशुद्धाअवस्थेत आहे. सध्या तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ही दिल्लीतील निर्भया घटनेसारखीच आहे. या घटनेनंतर पीडितेच्या प्रकृतीची चौकशी आणि तपास कार्यातील गती जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली. यात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि प्रवक्त्या संजना घाडी इत्यादी महिला नेत्या सहभागी होत्या. या शिष्टमंडळाने नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पीडितेच्या प्रकृतीची व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडितेवर सुरू असणाऱ्या उपचारांचीही व्यवस्थित माहिती घेतली. त्यानंतर नागपूर-गडचिरोली विभागाचे विशेष महानिरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासण्यासंदर्भात निवेदन दिले.

निवेदनात केल्या 'या' मागण्या...

1) सदर पीडितेला शासनाच्या मनोधर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत व समुपदेशन करण्यात यावे.

2) आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

3) सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला तात्काळ न्याय देण्यात यावा.

4) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

याप्रसंगी नागपूर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, किशोर कुम्हेरिया, नितीन सोळंकी जिल्हा समन्वयक, वंदना लोणकर जिल्हा संघटक रामटेक, तसेच जिल्ह्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT