भंडारा : रोशन खोडके हत्या प्रकरण; मेव्हण्याच्या मदतीने बहिणीने केला भावाचा खून अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

भंडारा : रोशन खोडके हत्या प्रकरण; मेव्हण्याच्या मदतीने बहिणीने केला भावाचा खून

अवघ्या चार तासात आरोपींना केली अटक

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

भंडारा : दगडाने ठेचून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कान्द्री जवळील पांजरा शिवारात घडली. घटनास्थळी आंधळगाव पोलीस पोहचवून घटनेचा पंचनामा करीत तपासाचे चक्र झपाट्याने वाढविले. अवघ्या चार तासातच मृतक रोशन रामू खोडके (वय 28) वर्षे राहणार कांद्री याच्या मारेकऱ्याला त्यात त्याची सख्खी मोठी बहीण लहान मव्हने व त्याच्या मित्राला आंधळगाव पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मोठी बहीण मनीषा चुधरे व लहान मेव्हणे हीतेंद्र रतिराम देशमुख (वय 29 वर्षे) व प्रेम उमा चरण सूर्यवंशी (वय 22) वर्षे यांच्या समावेश आहे.

मृतक रोशन रामू खोडके याचे आई-वडील लहानपणीच मरण पावल्याने मोठी बहिण मनीषा ईश्वर चुधरेकडे कांद्री यांच्याकडे राहत होता. रोशन बहिणीकडे मोठा होऊन मोलमजुरीच्या कामाला जात असे. रोशन ला दारूचा नाद लागल्याने रोशन नेहमी बहिण मनीषा व भाची यांना दारू पिऊन नेहमी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत असे.

त्यामुळे बहिण मनीषा पती ईश्वर नेहमी संतापलेले असत. राग अनावर झाल्याने रोशनची मोठ्या बहीनीने आपल्या जांब येतील लहान मेव्हणे हीतेंद्र देशमुख यांना रोशन नेहमी देत असलेल्या त्रास संबंधी सांगितले. यातच मोठी बहीण मनीषा व मेव्हणे हितेंद्र रतिराम देशमुख व प्रेम उमा चरण सूर्यवंशी यांनी रोशन खोडके याला कांद्री येथुन दारू प्यायला दिली.

हे देखील पहा-

मोटर सायकलने पांजरा गावातील शेत शिवारात नेऊन त्याचा गळा दाबला व त्यानंतर त्याच्या डोक्यावर पाठीमागे दगडाने मारून ठार केले. मात्र हे सर्व आरोपी अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात आले असून तीनही आरोपी यांना आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकायसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

WhatsApp मध्ये येत आहेत 'हे' अद्भुत फीचर्स, जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती

IND vs ENG : जसप्रीत बुमराह OUT, कुलदीप-अर्शदीप IN? निर्णायक कसोटीसाठी भारताचे संभाव्य ११ शिलेदार

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

SCROLL FOR NEXT