Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : पायाभूत सुविधांचा अभाव; ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार, साकोली विधानसभा क्षेत्रातील गट ग्रामपंचायतीने केला ठराव

Bhandara News : साकोली मतदार संघात विकास मात्र खुंटला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेली देवरी, सानगाव, सायगाव या जंगल व्याप्त भागात गाव असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केलं जाते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : गावांचा विकास झाला नाही, पक्के रस्ते अद्याप झालेले नाहीत. एकिकडे देश अमृत महोत्सव साजरा करतोय व सानगाव येथे जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ताच नाही. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील देवरी, सायगाव, सानगाव या गट ग्रामपंचायतीने ठराव करत सदरचा निर्णय घेतला आहे. 

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे. मात्र अजूनही भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही. भावी मुख्यमंत्री संबोधल्या जाणाऱ्या कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा साकोली मतदार संघात विकास मात्र खुंटला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेली देवरी, सानगाव, सायगाव या जंगल व्याप्त भागात गाव असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केलं जाते. गावात जायला पक्का रस्ता नाही. दुसरीकडे सायगाव येथे तर स्वत्रंत काळापासून जाण्यासाठी पक्का रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. अनेकदा निवेदन दिले मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच आहे.  

एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेल्या तिन्ही गाव विकाच्या मुख्य प्रवाहातून कोसो दूर आहेत. या गावांची परिस्थिती पाहिल्यावर स्वतंत्रपूर्वीची परिस्थीती असल्याचे दिसून येते. याच कच्या रस्त्यानी गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत. दुसरीकडे एसटी बस देखील गावात पोहचली नाही. पावसाळ्यात तर या रस्त्यांवर जाताना तारेवरची कसरत करावी लागत असते. या सर्वानी त्रस्त ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. यामुळे प्रशासन आता यापुढे गावाबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT