Bhandara News Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

दुर्दैवी घटना..घरात झोपलेल्या दोन चिमुकल्‍या भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू

दुर्दैवी घटना..घरात झोपलेल्या दोन चिमुकल्‍या भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू

अभिजीत घोरमारे

भंडारा : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या (Education Department) अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे. (Bhandara News Snak Bite)

सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडाचे नाव आहे. दोन्‍ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून साप (Snake) आत आला. तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश (Snake Bite) केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्‍याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले. यानंतर दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले होते.

उपचारादरम्‍याना दोघांचाही मृत्‍यू

भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT