भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; सलगच्या पावसाने जिल्ह्यातील 5 मार्ग बंद

भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; सलगच्या पावसाने जिल्ह्यातील 5 मार्ग बंद
Bhandara News Heavy rain
Bhandara News Heavy rainSaam tv

भंडारा : आज सकाळी पावसाने जोरदार बैटिंग सुरू केली असून सलगच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्याचा परिणाम स्वरूप जिल्ह्यातील 5 गाव मार्ग बंद झाले आहे. विशेष म्हणजे (Bhandara) भंडाऱ्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) मिळाला आहे. (Bhandara News Orange Alert)

Bhandara News Heavy rain
राष्‍ट्रवादी हा कुठलाही व्हिजन नसलेला पक्ष; भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा

सततच्या पावसामुळे (Rain) जिल्ह्यातील पाच गाव मार्ग बंद झाले आहेत. त्यात पाऊलदवणा ते बेला, लाखांदूर ते पिंपळगाव कोहळी, अड्याळ ते विरली, विरले ते सोनेगाव, सोनमाला ते कोढ़ा मार्ग बंद झालेले आहे. मात्र या गावांना जोडणारे इतर पर्यायी मार्ग सुरू असल्याने सध्या गावाचा संपर्क तुटला नाही. तर दुसरीकडे गोसेखुर धरणाचे 33 पैकी 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून 1379 क्यूमॅक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दोन दिवस मुसळधारेची शक्‍यता

विशेष सलग दोन दिवस ऑरेंज अलर्ट मिळाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मागील महिन्यात दोनदा या अतिवृष्टिने पूर आल्याने येणारा पाऊस मागच्या पुराची आठवण करून देणारा ठरत असून जिल्हावासीय येणाऱ्या पावसाच्या दहशतीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com