Nashik’s Harihar Fort Trek Saam
महाराष्ट्र

हरिहर किल्ल्यावरून उतरताना तोल गेला, खोल दरीत पडला; युवकाचा जागीच मृत्यू

Nashik’s Harihar Fort Trek: नाशिक जवळील हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान तरुणाचा पाय घसरून मृत्यू. मृत तरुणाचे नाव आशिष समरीत, वय २८, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी.

Bhagyashree Kamble

  • नाशिक जवळील हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान तरुणाचा पाय घसरून मृत्यू.

  • मृत तरुणाचे नाव आशिष समरीत, वय २८, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी.

  • ट्रेक उतरताना अपघात घडला, जागीच मृत्यू झाला.

  • त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नाशिक जवळील हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरूणाचा पाय घसरून पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनेच्या दिवशी तरूण आपल्या मित्रांसह ट्रेकर ग्रुपमध्ये सहभागी होऊन हरिहर किल्ल्यावर ट्रेकसाठी आला होता. मात्र, ट्रेकिंग करत असताना तरूणाचा पाय घसरला आणि तो थेट खाली कोसळला. उंचावरून दगडावर पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष टिकाराम समरीत (वय वर्ष २८) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो भंडारा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही धक्कदायक घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी आशिष आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप शनिवारी हरिहर किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावर चढले. नंतर किल्ल्यावर थांबून परतीच्या मार्गाला लागले.

दुपारी साधारण बाराच्या सुमारास त्यांनी किल्ला उतरण्यास सुरूवात केली. मात्र, आशिष याचा पाय निसटला. तरूण थेट किल्ल्यावरून थाली कोसळला. उचांवरून पडल्यामुळे तो दगडावर पडला. दगडावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला. नंतर मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर समरीत कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT