Bhandara Go Shala File Pic
महाराष्ट्र

Bhandara News: धक्कादायक! चारापाणी अभावी गोशाळेतील ३४ जनावरांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभम देशमूख, भंडारा

34 Cattles Died In Go Shala In Bhandara :

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यामधील धानोरा गावात एक धक्कादायक घटना घडलीय. एका गोशाळेतील ३४ जनावरांचा मृत्यू झालाय. चारा आणि पाण्याच्या अभावामुळे या जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान गडचिरोली येथील कुरखेडा येथील पोलीसांनी कत्तलखाण्यात नेणाऱ्या जनावरांना पकडून दोन दिवसांपूर्वी बळीराम गोशाळेत पाठविले होते. मात्र त्या जनावरांचा चारा पाणी न केल्यामुळे गुदमरून मृत्यू झालाय.(Latest News)

गोशाळा असून त्यात जनावरांसाठी चारा नसणं हे कत्तलखान्यासारखं आहे. दरम्यान गोशाळा संचालकाविरुद्धात मागील वर्षी गहू तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. तब्बल २२ संचालकांना अटकसुद्धा झाली होती. त्यानंतरही ही गोशाळा अनाधिकृत सुरूच होती एकंदरीत अधिकारी आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने अशा कितीतरी गोशाळा सुरूच आहेत. त्यांच्यावर कोर्ट कारवाई सुद्धा झाली असतानाही बिनधास्तपणे गो तस्करीचा धंदा सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशाची सुटका

काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात गोवंशाची सुटका करण्यात आली होती. कत्तलीसाठी बुलढाण्यातील मिल्लतनगर भागात गोवंशाची जनावरे वाड्यात कोंबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत ३७ गोवंश जनावरांची सुटका केली होती. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील मिळाली पारपेठ भागातील मिल्लतनगर येथील एका वाड्यामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी कोंबून ठेवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT