Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : भंडाऱ्यात बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; कालावधी उलटूनही भातपीक निघाले नाही

Bhandara News : मांगली चौरस येथील काही शेतकऱ्यांनी आसगाव येथील एका कृषी केंद्रातून रब्बी हंगामात भातपीक लागवडीसाठी केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे भात पिकाचं वाण घेवून त्याची लागवड केली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: बनावट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आला आहे. रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले भातपीक दिलेला कालावधी उलटून देखील हातात आलेला नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.  

भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास इथं कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मांगली चौरस येथील काही शेतकऱ्यांनी आसगाव येथील एका कृषी केंद्रातून रब्बी हंगामात भातपीक लागवड केली. पीक लागवडीसाठी केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे भात पिकाचं वाण घेवून त्याची लागवड केली. या पिकाचे उत्पादन १०० दिवसात येण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 

आणखी काही दिवस थांबावे लागणार 

दरम्यान हे भात पिकाची लागवड केल्यानंतर १०० दिवसात त्याचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितलं गेले होते. मात्र, १२५ दिवस लोटूनही भातपीक हाती आलेलं नाही. तर शेतकऱ्याला या भात पिकासाठी आणखी २० ते २५ दिवस थांबावं लागणार आहे. अर्थात पीक उत्पादन हाती येण्यास विलंब होत असल्याने खरीप हंगामासाठी शेती तयार करण्यास देखील विलंब होत आहे. 

आणखी काही दिवस थांबावे लागणार 

दरम्यान हे भात पिकाची लागवड केल्यानंतर १०० दिवसात त्याचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितलं गेले होते. मात्र, १२५ दिवस लोटूनही भातपीक हाती आलेलं नाही. तर शेतकऱ्याला या भात पिकासाठी आणखी २० ते २५ दिवस थांबावं लागणार आहे. अर्थात पीक उत्पादन हाती येण्यास विलंब होत असल्याने खरीप हंगामासाठी शेती तयार करण्यास देखील विलंब होत आहे. 

भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे मागितली दाद 

सदरच्या प्रकाराबाबतची तक्रार कृषी विद्यापीठ आणि कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. यानंतर एका कृषी तज्ञांच्या टीमने पिकाची पाहणी केली. यात त्यांनी दिलेल्या अहवालानंतर आता शेतकऱ्यांनी त्याची फसगत झाल्याने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी; यासाठी ग्राहक मंचात दाद मागण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT