Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: प्रेमप्रकरणातून भांडण; चाकूच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू, दुसरा गंभीर

प्रेमप्रकरणातून भांडण; चाकूच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू, दुसरा गंभीर

अभिजीत घोरमारे

भंडारा : प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात दोन तरुणांवर धारदार चाकूने प्रहार करण्यात आल्याने यात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना (Bhandara News) भंडारा जिल्हाच्या जवाहरनगर पोलिस (Police) स्टेशन हद्दित ठाणा न्याहारवाणी रस्त्यावर घडली आहे. (Tajya Batmya)

आवेज हसन शेख (रा. ठाणा) असे मृताचे नाव असून श्रेयस मुन्ना वाहाणे (वय १८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आरोपित तन्वीर पठाण (वय २२) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे. मृतक आवेज शेख याला भंडारा येथील दोन्ही तरुणांनी फोन करून बोलावले. दरम्यान, आवेज व श्रेयस वाहने ठाणा निहारवाणी रस्त्यावर गेले होते. भंडारा येथून आलेल्या दोन्ही तरुणांनी वादातून आवेज व श्रेयसवर चाकूने वार केले. यात आवेजच्या मानेला, पोटाला व हाताला चाकूचा जबर वार (Crime News) लागला. यात आवेजच्या मृत्यू झाला. तर श्रेयस हा गंभीर जखमी झाला.

यावेळी तेथे दोन तरुणी सुद्धा उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे।पसार झालेल्या दोन्ही आरोपींनी भंडारा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात तन्वीर पठाण व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे. रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयसने ठाणा येथील आपल्या मित्रांना घटनेची माहिती दिली. तीन ते चार मित्र घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आवेज व श्रेयस रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. दोघांनाही लगेच शहापूर आरोग्य उपकेंद्र येथे दुचाकीने आणले. मात्र, तोपर्यंत आवेजचा मृत्यू झाला. श्रेयसवर प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashomati Thakur : मला ब्लॅक करतोय, २५ लाखांची मागणी; यशोमती ठाकूरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर खळबळजनक आरोप

Delhi Politics : दिल्लीत 'आप'ला मोठा झटका; बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

VIDEO : हेमंत पाटील-प्रताप पाटील चिखलीकर मनोमिलनाचा महायुतीला फायदा?

SCROLL FOR NEXT