Latur News
Latur NewsSaam tv

Latur News: विवाहितेवर अत्याचार; माजी सैनिकाला कारावास, एक लाखाचा दंड

विवाहितेवर अत्याचार; माजी सैनिकाला कारावास, एक लाखाचा दंड
Published on

लातूर : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका माजी सैनिकाला सात वर्षांचा (Latur News) कारावास आणि एक लाखाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आठ वर्षानंतर पिडीत महिलेला न्‍याय मिळाला आहे. (Live Marathi News)

Latur News
Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' तारखेनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पीडित विवाहिता ही तिच्या शेतात काम करण्यासाठी २ एप्रिल २०१५ रोजी गेली होती. दरम्यान आरोपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडित विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उत्तम हरिश्चंद्र जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून उदगीर (Udgir) येथील सत्र न्यायालयामध्ये अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपीने दोष नाकारल्याने या खटल्याची सुनावणी उदगीर येथील सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात घेण्यात आली.

Latur News
Bajar Samiti Election: नंदुरबारमध्ये शिंदे गट, भाजपा समोरासमोर

१२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील पाच साक्षीदार फितूर झाले. पीडित विवाहितेने दिलेली साक्ष आणि इतर आनुषंगिक पुरावे ग्राह्य धरून उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी आरोपी मल्लिकार्जुन माणिकअप्पा म्हेत्रे याला पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर एक लाख रुपयांचा दंड आणि तो दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर दंडाची संपूर्ण रक्कम ही पीडित विवाहित महिलेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com