Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

खुनाच्‍या गुन्‍ह्यातील कैदीने फोडले सहकैद्याचे डोके; भंडारा कारागृहातील प्रकार

खुनाच्‍या गुन्‍ह्यातील कैदीने फोडले सहकैद्याचे डोके; भंडारा कारागृहातील प्रकार

अभिजीत घोरमारे

भंडारा : खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेल्या कैदीने क्षुल्लक कारनाने आपल्या बैरेकमधील सहकैद्याचे जेवण वाढण्याच्या डवल्याने डोके फोडून जखमी केल्याची घटना भंडारा (Bhandara) कारागृहात घडली आहे. मारहाण करणारा कैदी हा मानसिक रोगी असल्‍याचे सांगण्यात येत आहे. (bhandara news prisoner of the crime broke the head of the fellow prisoner)

न्यायालयीन बंदी क्रमांक 84 असलेला राजू रविंद्र मारबते (वय 24) असे मारहाण करणाऱ्या आरोपी कैद्याचे नाव आहे. तर महादेव वाशिराम कारमोरे (वय 33) असे जखमी सहकैद्याचे नाव आहे. भंडारा कारागृहात (Police) पोलिस हवलदार पदावर असलेले फिरयादी शिवशंकर सहारे हे सर्व कैद्याना बैरेकमध्ये बंद करून बैरेकच्या बाहेर पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान त्यांना बैरेक क्रमांक 1 मधून कैद्याचा ओरडण्याचा आवाज आला. त्‍यांनी लागलीच डोकावून पाहाले असता न्यायालयीन बंदी महादेव वाशिराम कारमोरे यांच्या (Crime News) डोक्यातुन रक्त निघाल्याचे दिसले.

उपचारासाठी दाखल

अधिक माहिती घेतली असता आरोपी कैदी राजू मारबते याने क्षुल्लक कारणाने जेवन वाढण्याच्या डवल्याने वार करत डोके फोडून जखमी केले होते. लागलीच फिर्यादीने तुरुंग अधीक्षक यांना माहिती देत जखमी कैद्याला भंडारा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मारहाण करणारा आरोपी हा मानसिक रुग्ण असून त्यांच्या या आजारावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याची तक्रार भंडारा पोलिसात दाखल करण्यात आली असून भंडारा पोलिसांनी कलम 324 भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरु आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT