Bhandara Food Poisoning
Bhandara Food Poisoning Saam TV
महाराष्ट्र

Food Poisoning : धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; २०० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

अभिजित घोरमारे

Bhandara Food Poisoning : लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे 200 जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे उघडकीस आला आहे. रात्री भोजन केल्यानंतर काहींना त्रास व्हायला लागला, तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत उपचाराअंति सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सरांडी येथील मदन नामदेवराव ठाकरे यांच्या मुला विवाह लाखांदुर तालुक्यातील किन्ही येथे पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सरांडी येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळच्या सुमारास या कार्यक्रमात किन्ही, सरांडीसह नजीकच्या गावातील पाहुण्यांनी हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या सकाळी काहींना उलटी, पोटदुखी, हगवण, मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयांत धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथामिक उपचार करून त्यांना घरी सोडून दिले.

दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होत, सर्व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावातील सात ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT