शुभम देशमुख
भंडारा : जिल्ह्यातील जांभोरा येथील राजकुमार मारोती गहाणे यांच्या मुलीचा साक्षगंध कार्यक्रमात भोजन केल्यानंतर जेवणातून अनेकांना विषबाधा झाली आहे. कार्यक्रमाच्या दोन दिवसांनंतर उलट्या व जुलाबचा त्रास जाणवू लागण्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ५२ जणांवर उपचार सुरु आहेत.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील जांभोरा या गावात २२ सप्टेंबरला राजकुमार गहाणे यांच्या घरी मुलीच्या साक्षगंध कार्यक्रम आयोजित केले होते. साक्षगंध कार्यक्रम पार पाडल्यानंतर आलेले सर्व पाहुणे जेवण करून गावाकडे गेले. परंतू गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करुन आपल्या घरी गेले असतांना सुध्दा विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला नाही. काहीना थोडा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार केला. (Food Poision) दोन दिवसानंतर बहुतेक नागकिरांना हगवण, उलटीचा त्रास होऊ लागल्याने गावात चर्चा होऊ लागली. तर २४ सप्टेंबरला बहुतेक महीला- पुरुषांना हगवण, उलटीचा त्रास जाणवू लागल्याने आरोग्य अधिकारी निषा पांडे व डॉ. सोनवणे यांना माहीती दिली असता जांभोरा येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कॅम्प लावण्यात आले.
पन्नासच्या जवळपास नागरिकांचे औषधोपचार करण्यात आले. एक रुग्ण शिरीष चंद्रभान गहाणे (वय १७) या मुलांचा शासकीय रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असून ३६ रुग्णांची आरोग्य अधिकारी डॉ. निषा पांडे, डॉ. सोनवाने, आरोग्य सेविका स्वाती मरस्कोले यांनी औषध उपचार केले असल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र विषबाधा कशामुले झाली याचे अद्याप कारण कळू शकले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.