Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : दोन महिन्यांपूर्वी झाले लग्न; गावात विवाह स्वागत समारंभाचे नियोजन, नवविवाहित तरुणाच्या मृत्यूने खळबळ

Bhandara News: कुटुंब आणि समाजातील परंपरा लक्षात घेऊन रीतिरिवाजांनुसार गावात लग्न समारंभ ३० एप्रिलला होणार होता. परंतु या विवाह स्वागत समारंभापूर्वीच राहुल हा घरी कुणालाही न सांगता घरून अचानक बेपत्ता

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : मध्यप्रदेशातील तरुणीसोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नाची गाठ बांधली गेली. विवाह झाल्यानंतर गावातील मंडळींकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद मिळावे यासाठी गावात स्वागत समारंभ कार्यक्रमाने नियोजन केले होते. मात्र विवाह स्वागत समारंभाच्या दोन दिवसाआधी नवविवाहीत तरुण बेपत्ता झाला. आज या विवाहित तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या आलेसुर गावात हि घटना घडली आहे. राहुल राऊत (वय २८) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलचे लग्न मध्यप्रदेश सरकारच्या विशिष्ट योजनेचा अंतर्गत झाले होते. ज्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील एका मुलाचा आणि मुलीचा विवाह सामुदायिक परिषदेत केला जातो. नवविवाहित जोडप्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत राहुलचे लग्न २१ फेब्रुवारी रोजी लखनवाडा गावात एका परिषदेद्वारे करण्यात आले होते.

अचानक झाला बेपत्ता 

परंतु कुटुंब आणि समाजातील परंपरा लक्षात घेऊन रीतिरिवाजांनुसार गावात लग्न समारंभ ३० एप्रिलला होणार होता. परंतु या विवाह स्वागत समारंभापूर्वीच राहुल हा घरी कुणालाही न सांगता घरून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून आला नाही. या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार देणार आली होती. 

चार दिवसांनी विहरीत आढळला मृतदेह 

दरम्यान राहुल हा मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह गावालगत शेतशिवरात एका विहिरीत आढळून आला आहे. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नोंद केली असून राहुलने आत्महत्या केली की, त्याची कुणी हत्या केली याचा शोध आता गोबरवाही पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT