Bhandara DCC Bank Saam tv
महाराष्ट्र

Bhandara District Bank Election : भंडारा जिल्हा बँकेवर महायुतीची एकहाती सत्ता; थांबविलेले सहा निकालही जाहीर

Bhandara News : दोन दिवसांपूर्वी मतमोजणी प्रक्रिया झाली यामध्ये पंधरा जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे सहा जागांचे निकाल थांबविण्यात आले होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी निवडणूक पार पडली आहे. बँकेच्या सर्व जागांवरील निकाल जाहीर करण्यात आले असून महायुतीने जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळविली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबविण्यात आलेल्या सहा जागांवरील निकाल देखील आज जाहीर करण्यात आल्याने बँकेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

भंडारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा कालावधी संपल्याने निवडणुक लावण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. दोन दिवसापूर्वी १५ जागांचा निकाल घोषित झाला होता. दरम्यान या निकाल प्रक्रियेत न्यायालयीन प्रक्रियेमुळे सहा जागांचे निकाल थांबविण्यात आले होते. मात्र या उर्वरित सहा जागांचे निकाल आज घोषित करण्यात आले असून या सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत.

महायुतीचा १७ जागांवर विजय  

दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या निकालात बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा ११ जागांवर विजय झाला होता. तर, काँग्रेसला केवळ ४ जागा जिंकता आल्या होत्या. न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेल्या ६ जागांचे निकाल आज घोषित करण्यात आलेत. यात सर्व सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे, आज निकाल घोषित झालेल्या विजय उमेदवारांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांचाही मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. 

नाना पटोलेंना झटका 

जिल्हा बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी झालेल्या प्रक्रियेत १७ संचालक महायुतीचे निवडून आले आहेत. यामुळे महायुतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता मिळविली आहे. तर, काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाल्याने काँग्रेसचे नाना पटोले यांचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

SCROLL FOR NEXT