Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

Bhandara News : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसात दोनदा पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: मागील आठवड्यात अवकाळी पावसाने राज्यभरात हजेरी लावली. यानंतर पुन्हा पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आलिया असनू (Bhandara) भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान भिजले असुन शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शिवाय शेतात देखील पावसाचे पाणी साचले आहे. (Live Marathi News)

सद्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसात दोनदा पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणुन ओळखला जातो. आता धान कापणी व मळणी सुरू आहे. त्यात पाच दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धान शेतात भिजला होता. तर हा धान वाळण्यासाठी म्हणुन शेतात शेतकर्यांनी तसाच ठेवला होता. पुन्हा रात्री जोरदार पाऊस बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 

आधीच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती लागवड केली. पण अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा पेचात फसला आहे. शेतीमधून चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. पण या अवकाळी पावसाने सर्व काही हिरावून घेतल आहे. शेतकऱ्यांनी कष्टांनी पिकविलेला धान डोळ्यादेखत खराब झाले. तर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चाऱ्याच्या प्रश्न देखील उद्भवणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करुन नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची ग्वाही दिली. पण भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या महालगाव येथे अद्यापही अधिकारी बांधावर पोहोचलेच नाही. अस्मानी संकट कोसळले असुन शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन सरकार शेतकऱ्यांसाठी काय नवीन घोषण करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT