Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : देशी बनावटीच्या पिस्टलसह साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; महिलेसह चौघेजण ताब्यात

Bhandara News : कारमधून चौघेजण आले असताना भंडारा बस स्टॉपवर फायरींग केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पथकाने घटनास्थळावरुन माहिती घेऊन पळुन जाणाऱ्या चार आरोपींचा पाठलाग करत ताब्यात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : एका गाडीतुन आलेल्या तिन ते चार जणांनी भंडारा बस स्टॉपवर दिवसा फायरींग केल्याची घटना घडली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. याचा शोध घेण्याकरीता पथक घटनास्थळी रवाना होत पळून जाणाऱ्या चार जणांना पाठलाग ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा देखील सहभाग आहे. 

भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील आकाश उर्फ डिक्रा रमेश महालगावे याच्या दोन महिन्याच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन दोन आठवड्यापुर्वी मंदीरात लग्न झाले. परंतु त्याच्या पत्नीचा जुना बॉयफ्रेंड तन्मय मेंढे (रा. गोठनगाव) हा महिलेला वारंवार फोन करुन ब्लॅक मेल करायचा. त्याला अद्दल घडविण्यासाठी नागपूर येथुन तिला बोलावुन घेतले. तर गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे याच्या जवळ असलेली पिस्टल घेऊन अनिकेत अर्जुन बांन्ते यांच्या सोबत तन्मय मेंढे याचा काटा काढण्याच्या उद्देशाने चौघेही गोठनगाव येथे निघाले होते. याच वेळी फायरींग झाली. 

कारमधून चौघेजण आले असताना भंडारा बस स्टॉपवर फायरींग केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पथकाने घटनास्थळावरुन माहिती घेऊन पळुन जाणाऱ्या चार आरोपींचा पाठलाग करीत लाखनी तालुक्यातील मौजा मानेगाव (सडक) येथुन ताब्यात घेतले. यात आकाश उर्फ डिका रमेश महालगावे (वय १९), गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे (वय २०), अनिकेत उर्फ रितीक अर्जुन बांते (वय २४) व एक महीला ताब्यात घेतले. 

साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक पिस्टल, तीन जिवंत काडतुस, एक फायर केलेला काडतुस तसेच गुन्ह्यात वापरयात आलेला चार चाकी वाहन, पाच मोबाईल व नगदी ४ हजार २०० रुपये असा एकुण ७ लाख ५० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

Shaniwar Wada Namaz Row : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक होणार? पुण्यातील शनिवारवाडा प्रकरण तापलं

SCROLL FOR NEXT