Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर; मुलीच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखलगुन्हा दाखल

Bhandara News : बालविवाह करणे कायद्याने गुन्हा मानला जात असताना देखील अनेकजण कमी वयात मुलामुलींचे विवाह लावून देत असतात. असाच प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: विवाह करण्यासाठी मुलामुलींची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर बालविवाह करण्यास कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील बालविवाह केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव भंडारा जिल्ह्यात समोर आले आहे. रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेली असताना बालविवाह झाल्याचे बिंग फुटले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भंडारा जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. बालविवाह करण्यात बंदी असून कायद्याने हा गुन्हा मानला जातो. असे असताना देखील वर आणि वधू १७ वर्षांचे असल्याची माहिती असतानाही दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह लावून दिला. इतकेच नाही तर विवाहानंतर सदर मुलगी गर्भवती झाली होती. यामुळे आरोग्य तपासणीकरिता कुटुंबीयांनी मुलीला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. 

पाच जणांवर गुन्हा दाखल 

याठिकाणी डॉक्टरांच्या तपासणीत मुलगी सात महिन्यांची गर्भवती असून ती केवळ १७ वर्षांची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी भंडाऱ्याच्या करडी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन बालिका वधूच्या तक्रारीवरून पती, सासू - सासऱ्यांसह पीडितेच्या आई- वडील अशा पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे. 

संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा पोलीस स्टेशन हद्दीत पीडित अल्पवयीन बालिकेची सासुरवाडी असल्याने करडी पोलिसांनी हा संपूर्ण तपास दोवणीवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. यानंतर पोलिसांनी पिडीतेचे वडील प्रल्हाद शिवणकर, आई लता शिवणकर (वय ३५), सासरे प्रकाश शेंद्रे (वय ४०), सासू गीता शेंद्रे (वय ३५) व पती अक्षय (वय १७) यांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT