Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News: मजुरांच्या वाहनाला अपघात; ७ महिला गंभीर जखमी

Bhandara News : शेतीच्या कामांची लगबग सुरु असून गावात मजूर मिळत नसल्याने दुसऱ्या गावातून शेतीकामासाठी मजूर आणले जातत्. याकरिता वाहनांची सुविधा केली जात असते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : एका गावातून दुसऱ्या गावी मंजुरीने शेतीच्या कामासाठी जात असलेल्या मजुरांच्या वाहनाला अपघात (Accident) झाला. चारचाकी गाडी पलटी झाल्याने वाहनातील ७ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने (Bhandara) भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Tajya Batmya)

भंडारा जिल्ह्यातील करडी गावाजवळ हा अपघात झाला. सद्या शेतीच्या कामांची लगबग सुरु असून गावात मजूर मिळत नसल्याने दुसऱ्या गावातून शेतीकामासाठी मजूर आणले जातत्. याकरिता वाहनांची सुविधा केली जात असते. अशाच प्रकारे जांभोरा गावातून १९ महीला व दोन पुरुष हे चारचाकी गाडीने तोंडरी येथे शेतीच्या कामाकरीता जात होते. याच दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाडी झाली अनियंत्रित 

गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्याने बसलेल्या महिलांनी जोरात आरोड्या मारल्या. यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात मजुरीसाठी जात असलेल्या ७ महिलांना जास्त मार लागला असल्याने त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित लोकांना प्रथमोपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या कलदगाव येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

Mumbai To Amruteshwar Temple: रेल्वेने, बसने की कारने? मुंबईवरून अमृतेश्वर मंदिराला जाण्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते?

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT