Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : विषारी धान खाल्ल्याने ८ कोंबड्यांचा मृत्यू; लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल

Bhandara News : दोघांमधील या जुन्या वादातून घरानजीकच्या परिसरातील जमिनीवर फेकलेले विषारी धान खाल्ल्याने केल्याने तब्बल ८ कोंबड्यांचा मृत्यू झाला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा ; गावात राहणाऱ्या दोन जणांचा जुना वाद होता. या जुन्या वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने सकाळच्या (Bhandara) सुमारास घराच्या समोर विषारी द्रव्य लावलेले धान फेकले होते. हे धान खाल्ल्याने ८ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी या गावात हि घटना घडली आहे. गावात एकाच गल्लीत राहणाऱ्या दोघांचा वाद होता. दोघांमधील या जुन्या वादातून घरानजीकच्या परिसरातील जमिनीवर फेकलेले विषारी धान खाल्ल्याने केल्याने तब्बल ८ कोंबड्यांचा (Chicken) मृत्यू झाला. या आठ कोंबड्या चार व्यक्तीच्या होत्या. यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

या घटनेत स्थानिक पिंपळगाव को येथील भाऊराव दामा बंसोड (वय ४९), निर्मला बाबाजी गजभिये (वय ५६), आबाजी पुंडलिक गजभिये (वय ५५), भाऊराव ढेमन रामटेके (वय ५६) नामक व्यक्तींच्या तब्बल २ हजार २०० रुपये किमतीच्या ८ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तक्रारीवरून स्थानिक पिंपळगाव को येथील अमृत सीतकुराब बंसोड (वय ६०) नामक आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची पत्रकार परिषद

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT