Bhandara Police Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Police : भंडाऱ्यात २२ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; कारधा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Bhandara News : , तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखूची वाहतूक केली जाते. या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने याची विक्री व वाहतूक केली जात असते. हा प्रकार सर्रासपणे सुरु असून अनेकदा या विरोधात कारवाया देखील झाल्या आहेत. अशाच प्रकारे सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून २२ लाख रुपयांची सुगंधित तंबाखू पकडण्यात आली आहे. 

गुटखा, तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखूची वाहतूक केली जात असते. या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील वाहतूक सुरूच आहे. दरम्यान पान पराग कंपनीचा हा सुगंधित तंबाखू साठा रायपूर येथून भंडाराकडे एका ट्रकमधून आणला जात होता. याबाबतची माहिती कारधा पोलिसांना मिळाली होती. 

चालकासह एकजण ताब्यात 

मिळालेल्या माहितीवरून कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. यानंतर माहितीनुसार तंबाखू घेऊन जाणारा ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी चालक बलराम रीचोलिया (वय ४०, रा. इंदोर) आणि क्लिनर दिनेश गुजरिया (वय ३०, रा इंदोर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

राष्ट्रीय महामार्गावरून सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असताना भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी २२ लाखांचा सुगंधित तंबाखू पकडला. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूसह वाहतूक केला जाणारा ट्रक असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वर्षाची कारधा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार, एक गंभीर जखमी

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

SCROLL FOR NEXT