Bhandara Police Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यात १४ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Bhandara News : गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. कारधाहून भंडाराकडे येत असलेल्या वाहनाला थांबविण्यात आले.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
; भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने छुप्या पद्धतीने नेला जात असलेला १४ किलो वजन असलेला दीड लाखाचा गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या प्रकरणी (Police) पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई (Bhandara) भंडारा शहरात रात्रीच्या सुमारास करण्यात आली. (Live Marathi News)

गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. कारधाहून भंडाराकडे येत असलेल्या वाहनाला थांबविण्यात आले. यात चौकशी केली असता फिरोज व मोहम्मद हे दोघेही ओडिसा राज्यातून गांजा प्लास्टीकच्या बोरीतून आणत (Bhandara Police) असल्याचे आढळले. यात प्लास्टीकच्या बोरीमधून तब्बल १४ किलो ४८८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख ४४ हजार ८८० रुपये सांगण्यात येत आहे. याशिवाय त्याच्या ताब्यात असलेला ट्रक, ४३३ भाजीचे कॅरेट व दोन मोबाइल जप्त करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केलेल्या कारवाईत दीड लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई रात्रीच्या सुमारास भंडारा शहरातील सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरात करण्यात आली. यात दोन इसमांना अटक करण्यात आली आहे. फिरोज अहमद नबी रसुल (वय ४२), मोहम्मद शाहरुख मोहम्मद सलीम (वय २६, दोन्ही राहणार कुंभारपारा संबलपूर, ओडिसा) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्याची किंमत १३ लाख ७७ हजार ५३० रुपये सांगण्यात येते. भंडारा पोलिसांनी दोघांविरुद्ध एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार मोहरकर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT