Lakhandur youth dies of electric shock Saam Tv News
महाराष्ट्र

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Bhandara News : भंडारा येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नवीन घरात झोपायला गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात घडली असून युवराज जाधव थेरे असं मृतक तरुणाचं नाव आहे.

Prashant Patil

शुभम देशमुख, साम टिव्ही

भंडारा : भंडारा येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नवीन घरात झोपायला गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात घडली असून युवराज जाधव थेरे असं मृतक तरुणाचं नाव आहे. मृतक युवराज थेरे यांचे राजनी येथे नवीन घर बांधण्यात आले होते. ते दररोज रात्री त्या नव्या घरी झोपण्यासाठी जात होते. काल रात्री ते झोपायला गेले असता त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा केला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाची आत्महत्या

कोल्हापुरातही खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मारुती व्हरकट असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आहे. मारुती व्हरकट यांचा आज गुरुवारी सकाळी विहिरीतून मृतदेह काढला आहे.

कागल नगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे. मुख्याध्यापकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मुख्याध्यापकाचा मृतदेह विहिरीतून मृतदेह काढला. मुख्याध्यापकाने आत्महत्या का केली, याचा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT