कोरोनात पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी 'तिचा' संघर्ष! SaamTvNews
महाराष्ट्र

Bhandara : कोरोनात पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी 'तिचा' संघर्ष!

पतीच्या मृत्यूनंतर त्याचा इस्त्रीच्या व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय अनिताने घेतला. मात्र, लोकांचे बोलणे त्यांच्या नजरा या अनिताला सुरुवातीच्या काळात अतिशय असहनीय झाल्या. पहिले आठ दिवस काम करून आल्यानंतर अनिता रवींच्या फोटो समोर बसून सतत रडत राहिली.

अभिजित घोरमारे

भंडारा : कोरोना महामारीमध्ये बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यातही बऱ्याच कुटुंबातील कुटुंब प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर बऱ्याच कुटुंबात घराची सर्व जबाबदारी संबंधित मृत व्यक्तीच्या पत्नीच्या खांद्यावर येऊन पडल्याचे दिसत आहे. भंडारा (Bhandara) शहरातील अश्याच एका स्त्रीला पतीच्या मृत्यूनंतर जगण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पतीच्या अकाली मृत्यूनंतर या स्त्रीचे जीवन विस्तवातील निखाऱ्यासारखे झाले आहे. मात्र, याच निखाऱ्या तून तिला जगण्याची नवी उमेद ही मिळाली आहे.

हे देखील पहा :

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत 27 एप्रिल 2021 मध्ये भंडारा शहरातील रवी क्षीरसागर या 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये त्याचा मृत्यू (Death) झाला. रवीच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी आणि दोन मुलांवर जणू आभाळच कोसळले. कारण रवी हा घरचा कर्ता पुरुष होता. रवीच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनिता क्षीरसागर एकट्या पडल्या. 9 व्या वर्गात शिकणारा एक मुलगा 7 व्या वर्गात शिकणारा दुसरा मुलगा, यांचे शिक्षण कसे पूर्ण करावे? पैसा कुठून आणावा? जगावं कसं? असे बरेच प्रश्न अनिता यांच्यासमोर निर्माण झाले. त्यामुळे आपण ही मरून जावं असे विचार देखील त्यांच्या मनात बऱ्याचदा आले. मात्र, माझ्यानंतर या मुलांचं काय होईल ह्या विचाराने त्यांनी स्वतःला धीर दिला आणि आलेल्या परिस्थितीला निकराने सामोरे जाण्याची तयारी केली.

रवी क्षीरसागर हे भंडारा शहरातील गांधी चौकात एका छोट्याशा दुकानात कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता यांनीही हेच काम करून उदरनिर्वाह करण्याचे ठरविले. मात्र, या अगोदर कधीही त्यांनी कधीही हातात इस्त्री घेतली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्यांच्या दिराकडून हे काम शिकून घेतले. ज्या ठिकाणी अनिता यांना कपडे इस्त्री करण्याचे काम करायचे होते, तो परिसर सतत कामगार लोक आणि इतर लोकांमुळे गजबजलेला असतो.

त्या लोकांचे बोलणे त्यांच्या नजरा या अनिता यांना सुरुवातीच्या काळात अतिशय असहनीय झाल्या. त्यामुळे पहिले आठ दिवस काम करून आल्यानंतर अनिता रवींच्या फोटो समोर बसून सतत रडत राहिल्या. मात्र, भविष्याचा विचार करून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन तोच व्यवसाय आहे सुरू ठेवला. पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक ताण अतिशय कठीण असतो. एकट्या स्त्रीला जगणे हे अतिशय कठीण असते. माझ्या पतीच्या ऐवजी मी मेले असते तर बरं झाल असतं असे अनिता नेहमीच बोलून दाखवतात. माझ्यावर आलेली परिस्थिती इतर कोणावर ही येऊ नये अशी प्रार्थना अनिता करत आहे.

'अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' बहिणाबाईच्या कवितेतील ही ओळ सध्या अनिता त्यांच्या आयुष्यात जगत आहेत. आई आणि बाप होण्याचे दोन्ही कर्तव्य पूर्ण करताना आणि अनिता यांचे तारेवरची कसरत होत आहे. मात्र, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व संकटाना तोंड देत अनिता यांचा जीवन संघर्ष सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT