Bhandara Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : धक्कादायक! समुपदेशन केंद्रावर पत्नीला बोलावलं अन्..., पतीचं चक्रावून टाकणारं कृत्य

Bhandara Crime News : या धक्कादायक घटनेने भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara News : समुपदेशन केंद्रावर चर्चा करण्यासाठी आलेल्या पत्नीवर पतीने चक्क ब्लेडने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. पत्नीने पतीसोबत त्याच्या घरी जाण्यास नकाराने दिल्याने पतीने हे भयंकर कृत्य केलं. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

ग्राम खांबा जांभळी येथील अश्विनकुमार मेश्राम आणि त्याची पत्नी टिकेश्वरी (22 वर्षे) या दोघा पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. अनेकदा भांडण विकोपाला जायचे. यामुळे पत्नीने या त्रासाला कंटाळून पोलिसात (Police) तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दोघांना चर्चा करण्यासाठी अभय समुपदेशन केंद्र, साकोली (Sakola) येथे बोलवण्यात आले होते. (Bhandara Crime News)

सुनावणीदरम्यान पती अश्विन हा पत्नी टिकेश्वरीला घरी नेण्यासाठी तयार होता, मात्र, पत्नीने जाण्यास नकार दिला. यामुळे वाद वाढला आणि रागाच्या भरात अश्विनने टिकेश्वरीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून, पुढील उपचार सुरू आहेत. पती अश्विन मेश्राम याला पोलिसांनी अटक करून कलम 307 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दारूच्या नशेत क्रूर कृत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर घटनेनंतर अंबरनाथ-बदलापूरमध्ये संताप; आरोपीला फाशीची मागणी

SSC Result 2026: दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला, पाहा मुंबई पुण्यासह ९ विभागाचा किती टक्के निकाल?

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा धुमाकूळ, 7व्या दिवशीही कमावले तब्बल इतके कोटी

'Raja Shivaji' च नाही तर बॉलिवूडमधील 'या' चित्रपटांचे शुटिंग झालंय साताऱ्यात, पाहा ठिकाणाची यादी

SCROLL FOR NEXT