Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत केली सुनेची हत्या

सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत केली सुनेची हत्या

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

भंडारा : सासऱ्यानेच कुऱ्हाडीने वार करत सुनेची हत्या केली. ही खळबळजनक घटना आज (१६ जून) सकाळी १० वाजताच्या सुमारास (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर (वय २४) असे मृत सुनेचे नावं आहे. तर सायाराम ईश्वरकर (वय ५७) असे पोलिसांनी (Police) अटक केलेल्या आरोपी सासऱ्याचे नावं आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्‍ह्यातील रोहना येथील सयाराम ईश्वरकर व मृतक सून प्रणाली ईश्वरकर यांच्यात सकाळी भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की सासऱ्याने घरातील कुऱ्हाड आणुन अंगणात भांडे धुत असलेल्या सुनेच्या (Crime News) मानेवर वार केला. यात प्रणाली ही रक्तबंबाड होउन जागीच कोसळली. अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

सासरा पोलिसांच्‍या ताब्‍यात

सदरची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली असुन पोलिसांनी घटनस्थळी येत पंचनामा केला. तसेच आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT