crime news
crime news 
महाराष्ट्र

कापड दुकानात काम करणा-या मुलीचे अपहरण; २४ तासांत युवक जेरबंद

अभिजीत घोरमारे

भंडारा crime news : ओळखीच्या फायदा घेत भंडारा शहरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या संशयितास भंडारा शहर पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. अजय श्याम गिरी (वय २०) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ताे नवरगावदेवी (ता. मौदा, जिल्हा नागपुर) येथील रहिवासी आहे. bhandara-city-police-arrested-accused-within-24-hrs-crime-news-sml80

शहरातील एका कापड़ दुकानात काम करणा-या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने भंडारा शहर पोलिसात दाखल केली हाेती. पाेलिसांनी सायबर सेलच्या सहकार्याने संबंधित मुलीचे मोबाइल लोकेशन तपासले. त्यानंतर पाेलिसांनी मौदा तालुक्याच्या नवरगावदेवी गाठले. तेथे त्याचा तपास लागू शकला नाही. पुन्हा पाेलिसांनी तपास चक्रे फिरवून युवकास अटक केली.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक राहाटे म्हणाले संबंधित मुलीच्या आईच्या तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने संशयित आरोपीचा शोध सुरु केला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातीलल खापा येथे संशयितास व संबधित मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT