Bhandara Bandh साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Bhandara Bandh : मोठी बातमी! आज 'भंडारा बंद'ची हाक; नेमकं कारण काय? पाहा काय उघडं अन् काय बंद राहणार

Bhandara Protest : तीन वर्षांच्या बालिकेवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज भंडारा बंदची हाक देण्यात आली आहे. बाजारपेठा आणि दुकाने बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

Bhandara Bandh Latest Marathi News : भंडारा शहरात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण शहरात उमटले असून, संतप्त नागरिकांनी नराधम आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज 'भंडारा बंद'ची हाक देण्यात आली आहे. बाजारपेठा, दुकाने बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता भंडारा बंद असेल अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित वासनिक (वय ३०) असे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर नागरिकांच्या मारहाणीत आणि स्वतःला जखमी करून घेतल्यानंतर आरोपीसह पीडित बालिकेला उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, "या नराधमावर येथे उपचार करू नका, त्याला आमच्या स्वाधीन करा," अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त जमावाने मेडिकल कॉलेज परिसरात तब्बल ७ तास जोरदार राडा घातला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस मुख्यालयासह ६ राखीव पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची कुमक तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये तैनात करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. अखेर प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठात्यांनी संतप्त नागरिकांशी चर्चा करून कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास तणाव काहीसा निवळला.

या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण भंडाऱ्यात संतापाची लाट पसरली असून, चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता भंडारा बंद असेल. रूग्णालय, शाळा सुरू राहतील, असे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्षाबंधनाला खरेदीची गोल्डन संधी; सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत 22K, 24K चा आजचा भाव किती?

Maharashtra News Live Update: सोलापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार

Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेश मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’, ११ अटी पूर्ण केल्यावरच मिळणार जोडणी

आश्रमशाळेत संतापजनक प्रकार! २१ मुलींचा विनयभंग; दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Chocklate For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी चॉकलेट खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा चॉकलेट ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT