accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident News: शहापूर-सातोना मार्गावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, पती आणि २ मुले गंभीर जखमी, संतप्त जमावाने वाहन पेटविले

Bhandara Accident Woman Death: शहापूर-सातोना मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत.

Rohini Gudaghe

शुभम देशमुख

Shahapur Satona Road Accident

अलीकडे रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. भरधाव वेगामुळे अपघात होत आहेत. असाच एक भीषण अपघात भंडारा जिल्ह्यात (Bhandara ) देखील झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती आणि दोन मुले जखमी झाले आहेत. शहापूर-सातोना मार्गावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (latest accident news)

वाहनाने अपघात झाल्याचे पाहून संतप्त जमावाने चारचाकी वाहनाला पेटविल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली (Bhandara Accident) आहे. शहापूर - सातोना मार्गावरील ही घटना आहे. अज्ञाताविरोधात भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कसा झाला अपघात

एक जोडपे शहापूर-सातोना मार्गावरून (Shahapur Satona Road) आपल्या दुचाकीवर प्रवास करत होते. दरम्यान लहान मुलाला तहान लागल्यामुळे या जोडप्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मुलाला तहान लागल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून ही महिला मुलाला पाणी पाजत होती. तेव्हाच भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.

जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २ मुले जखमी झाल्याची घटना शहापूर-सातोना मार्गावरील (road accident) घडली. ही चारचाकी भरधाव वेगात होती. अपघातानंतर तेथे नागरिकांचा मोठा जमाव जमला. घटनेने जमाव संतप्त झाला होता.

भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल

चारचाकी भरधाव वेगात होती, हे नागरिकांच्या लक्षात येताच जमावाने ती चारचाकी पेटवून (mob set fire to vehicle) दिली. या घटनेत अज्ञात इसमाविरोधा भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत कल्पना अमित हाडगे (वय २८) यांचा चारचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू (Bhandara Accident News Woman death) झाला आहे. तर पती अमित लीलाधर हाडगे आणि त्यांची २ मुले गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हुंडाई एक्सेल कंपनीची चार चाकी पूर्णतः जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : तरुणींच्या नृत्यात रंगला माहोल, पण अचानक स्टेज कोसळला अन्....; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

SCROLL FOR NEXT