Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

Accident News: मनीषकुमार हा भंडाऱ्यामधून आपल्या दुचाकीवरुन पवनीकडे जात होता. यावेळी त्याच्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, भंडारा, ता. २६ नोव्हेंबर २०२३

Bhandara Accident News:

भंडाऱ्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भंडाऱ्यामध्ये (Bhandara) ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनीषकुमार रामकृष्ण पांडे (वय,३४) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो गुरुनानक वार्ड शांतीनगर मधील रहिवासी आहे.

मनीषकुमार हा भंडारावरून आपल्या दुचाकीवरुन पवनीकडे जात होता. यावेळी त्याच्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची (Accident News) धडक दिली. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

या अपघातानंतर परिसरातील स्थानिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केला. अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी तसेच लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावी.. अशी मागणी रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थांनी केली.

या प्रकरणी प्रशासनाने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, अपघाताची अड्याळ पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कुठून पण कसाही करा प्रवास, नव्या वर्षांत सुरू होणार २ नवीन मेट्रो मार्ग

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT