Bhandara : 102 वर्षांच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क!  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara : 102 वर्षांच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क!

मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभागी होऊन, आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत.

अभिजित घोरमारे

भंडारा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडत आहेत. राज्यभरात यासाठी मतदान सुरू आहे. या लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत मूलभूत हक्क आणि अधिकार असलेला मतदानाचा हक्क बजावणे सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. लोकशाहीच्या या उत्सवात भारतीय स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या 102 वर्षांच्या लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव साजरा केला आहे.

हे देखील पहा :

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील घोडेझजी गावातील रहिवासी असलेल्या या 102 वर्षीय लक्ष्मी आजींनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. आज राज्यातील विविध भागासह भंडारा जिल्ह्यातही जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे.

मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभागी होऊन, आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच मतदान करत आलेल्या 102 वर्षांच्या घोडेझरी येथील लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? पुण्यात भाजप दादा, २४ जागांवर आघाडी

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Mumbai Travel: मुंबईतील या 5 ठिकाणांना भेट दिली नाही, म्हणजे मुंबई पाहिलीच नाही

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT