भंडाऱ्यात दुचाकीचा भीषण अपघात
सातपुडा ITI चे १८-१९ वर्षीय दोन मित्र जागीच ठार
स्वेटर आणण्यासाठी देव्हाडीहून निघाले होते दोघे
अकाली निधनाने देव्हाडी गावात शोकसागर
शुभम देशमुख, भंडारा
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील विरशी फाट्याजवळ तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने देव्हाडी गावावर शोककळा पसरली आहे. दोन तरूणांच्य अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणांची नावे यश राजेश उईके (वर्षे १९) व भारत भगवान बनकर (वर्षे १८) अशी असून दोघेही देव्हाडी (ता. तुमसर) येथील रहिवासी होते. यश हा स्वतःच स्वेटर दवनीवाडा येथील मावशीकडे विसरून आला होता. ते आणण्यासाठी यश व त्याचा जीवलग मित्र भारत हे दुचाकी क्रमांक एम.एच.३६ ए.पी. ६४५४ ने देव्हाडीहून निघाले.
मात्र विरशी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरशी दुचाकीची भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.यश व भारत हे दोघेही तुमसर येथील सातपुडा आयटीआयचे विद्यार्थी होते. अभ्यासू, शांत स्वभावाचे आणि कायम एकत्र असणारे हे दोघे मित्र परिसरात परिचित होते.
भारत यांच्या वडिलांचे देव्हाडी येथे भाजी विक्रीचे दुकान असून, यश उईके यांचे वडील रेल्वे विभागात कर्मचारी आहेत. दोन तरुण जीवांचा असा अचानक अंत झाल्याने देव्हाडी गावात शोकसागर उसळला आहे. घराघरांतून हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.