Bhagwan Gad Special Report Saam Tv
महाराष्ट्र

Bhagwan Gad : भगवान गड देशमुखांच्या पाठीशी, देशमुख कुटुंबीयांच्या भेटीनंतर शास्त्रींचे सूर बदलले; VIDEO

Special Report : सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर हत्या प्रकरणातील सर्व पुरावे सादर केले. यावर शास्त्रींनी काय प्रतिक्रिया दिली? या प्रकरणावरचा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Bhagwan Gad : नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे आरोपींची पाठराखण केल्यानंतर सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख शास्त्रींच्या भेटीला गेले. यावेळी शास्त्रींनी यु-टर्न मारलाय. नेमकं शास्त्री काय म्हणाले आहेत आणि धनंजय देशमुखांनी कोणते पुरावे दिले? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले त्यानंतर मात्र शास्त्री सूर बदलल्याचं चित्र आहे. आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्ष पाठराखण केली... त्यामुळे संतापलेल्या देशमुख कुटुंबिय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवान गडावर पोहचले. देशमुख कुटुंबाने कोणते पुरावे दिले आहेत? पाहूयात.

देशमुखांनी शास्त्रींना कोणते पुरावे दिले?

- दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा

- देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं

- आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला

- मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं

- न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी

बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवान गड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो... मात्र याच भगवान गडाच्या गादीवरुन महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती. मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरुन यु-टर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT