FB वर मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट येतेय तर सावधान! अश्लील चॅटींग, Video कॉल करत त्या घालतायत लाखोंचा गंडा Saam TV
महाराष्ट्र

FB वर मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट येतेय तर सावधान! अश्लील चॅटींग, Video कॉल करत त्या घालतायत लाखोंचा गंडा

फेसबुकवर आलेल्या मुलीची मैत्री करणे दोन जणांना चांगलेच महागात पडलं असून आत्तापर्यंत जवळपास 50 जणांना फेसबुक मैत्रीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड : सोशल मीडिया (Social Media) दिवसेंदिवस घातक होऊ लागला आहे. फेसबुकवर आलेल्या मुलीची मैत्री करणे अलिबाग मधील दोन जणांना चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर मुलीशी मैत्री करता मग सावधान अन्यथा लाखोंचा चुना लागलाच म्हणून समजा. लाखोंचा चुना लागला असला तरी समाजात आपली नाचक्की होईल या भीतीने पोलिसात तक्रार करण्यासही कोणी पुढे येत नाही.

फसविणारा मात्र उजळ माथ्याने समाजात वावरत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची मैत्रीबाबत आलेली रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि फसले गेलात तर तक्रार करा असे आवाहन रायगड सायबर सेल मार्फ़त करण्यात आले आहे.

सारे जग हे आता तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या एका क्लिकवर जवळ आले आहे. फेसबुक, व्हाट्सअँपवर, इन्स्ट्राग्राम, ट्विटर यासारख्या सोशल साईटवर हल्ली प्रत्येकजण व्यस्त झालेले आपण पाहत असतो. एकीकडे ह्या सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी काही वर्षांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती या साईटचा वापर आपल्या वयक्तिक आर्थिक फायद्यासाठी करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फसवणूक होत असलेले सायबर गुन्हे रोज घडत आहेत.

तरुणींची रिक्वेस्ट पाहून हुरळून जाऊ नये -

फेसबुक या सोशल साईटवर काही दिवसांपासून तरुणी ह्या मैत्रीच्या रिक्वेस्ट फेसबुक खातेदाराला पाठवितात. समोरून सुंदर तरुणीची आलेली रिक्वेस्ट पाहून तरुण मंडळी सोबत वयस्क व्यक्ती ही हुरळून जातात. आलेली मैत्री रिक्वेस्ट कोणतीही शहानिशा न करता स्वीकारतात आणि जाळ्यात अडकतात. त्यानंतर सुरू होतो व्हिडीओ कॉलिंग सिलसिला. समोरची तरुणी फेसबुकवर गोडगोड संभाषण करून मोबाईल नंबर घेते. त्यानंतर व्हाट्सअँपवर व्हिडीओ कॉलिंग करून समोरच्या पीडित व्यक्तीस गुंडाळण्यास सुरुवात करते.

हे देखील पहा -

व्हाट्सअँपवर रेकॉर्ड केलेली अश्लील चित्रफीत लावून समोर स्वतः असल्याचे भासवते. त्यामुळे समोरील पीडित व्यक्तीच्याही भावना चाळवतात आणि तिथेच फसतात. त्यानंतर समोरील तरुणी ही व्हिडीओ रेकॉर्ड करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होते. समाजातील लाजेखातर फसलेला व्यक्ती हा त्या तरुणीला पैसे देऊ लागतो. अलिबागमध्येही असे दोन जणांना फसविले असून साधारण अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही तक्रार करण्यास पुढे आले नसल्याने 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यत 50 जणांना अशा मैत्रीचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT