संजय गडदे, साम टीव्ही
'बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी आणि मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी परिमंडळ-१२ अंतर्गत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली. या रॅलीत महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. या बाईक रॅलीचे आयोजन वनराई पोलीस ठाणे ते दहिसर पोलीस ठाणे दरम्यान करण्यात आले.
झोन १२ मधील सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदारांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकारांनी देखील उपस्थिती दर्शविली होती. वनराई पोलीस ठाणे ते दहिसर पोलीस ठाणे दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांची बाईक रॅली पार पडली. अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१२ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकाऱ्यांच्या या बाईक रॅली काढण्यात आली.
गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाणे या ठिकाणी बाईक रॅलीचे उद्घाटन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, अरुण नलावडे आणि जयंत वाडकर यांचे हस्ते झाले. दिंडोशी पोलीस ठाणे हद्दीत काठीयावाड चौक, खोतकुँवा रोड, मालाड पुर्व, मुंबई या ठिकाणी रॅली आली असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याव्दारे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाबाबत जनजागृती केली.
तसेच ही रॅली समतानगर पोलीस ठाणे हद्दीत ठाकुर व्हिलेज, कांदिवली पुर्व, मुंबई या ठिकाणी आली असता, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन रॅलीतील महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशा घोषणा दिल्या. रॅलीमध्ये सहभागी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'भ्रुणहत्या पाप आहे', 'मुलगी शिकली, प्रगती झाली', 'गर्भलींग तपासणी कायद्याने गुन्हा आहे अशा घोषणा लिहिलेले फलक दखवत जागृती करण्यात आलीय.
दहिसर पोलीस ठाणे हद्दीत गोकुळ आनंद जंक्शन, पश्चिम द्रुतगती महामार्ग, दहिसर पुर्व, मुंबई या ठिकाणी बाईक रॅलीचा सांगता समारंभ झाला. या कार्यक्रमाकरीता अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१२, मुंबई तसेच मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री श्रीमती प्रतिभा शिंपी, अभिनेते समिर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राउत, प्रथमेश शिवलकर व हे उपस्थित होते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.