Karnataka Rapido Driver Crime News Saam TV
महाराष्ट्र

Karnataka Rapido Driver Crime News: एक हात दुचाकीवर आणि दुसरा...; रॅपिडो चालकाचं घृणास्पद कृत्य, तरुणीनं सांगितला थरारक प्रसंग

Woman Has Accused The Driver Of Rapido Bike: या प्रकरणी पीडित महिले लैंगिक छळ झाल्याचा आरोप केलाय.

Ruchika Jadhav

Bengaluru Crime News: देशात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कर्नाटकमधील बंगळुरू येथून देखील एक किळसवाणी घटना समोर आलीये. एका रॅपिडो चालकाने धावत्या दुचाकीवर अश्लिल चाळे केले आहेत. या प्रकरणी पीडित महिले लैंगिक छळ झाल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी या प्रकरणी रॅपिडो चालकाला ताब्यात घेतलंय. (Latest Crime News)

पीडित महिलेने आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आरोप केला आहे. चालकाने दुचाकी चालवत असताना हस्तमैथुन केलं. तसेच नंतर व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेज केल्याचं पीडितेने म्हटलं आहे.

ही किळसवाणी घटना शुक्रवारी घडली. सदर घटनेत पीडितेने पोलिसांत देखील या बाबत तक्रार दाखल केली असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रसंग ट्वीटवर शेअर करत आरोपीने पाठवलेल्या अश्लील मॅसेजचे स्क्रिनशॉट देखील पोस्ट केले आहेत.

पीडितेने आपल्या ट्वीटमध्ये लिलिलंय की, "शुक्रवारी मी मणिपूरमधील हिंसाचाराविरोधातील आंदोलनासाठी टाऊन हॉलमध्ये गेले होते. तेथून घरी परत येण्यासाठी मी रॅपिडो बाईक बूक केली होती. पण दुचाकीस्वाराने रॅपिडो मोबाईल ऍप्लिकेशनवर नोंदणीकृत असलेल्या बाईकऐवजी वेगळी बाईक आणली. बाईकबद्दल विचारलं असता नोंदणीकृत बाईक दुरुस्त करायला टाकली आहे, असं त्याने उत्तर दिलं.”

पुढे तिने लिहिलं की ,"प्रवासादरम्यान आम्ही एका अज्ञात ठिकाणी पोहोचलो. यावेळी रॅपिडो दुचाकीस्वार एका हाताने दुचाकी चालवू लागला आणि दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करू लागला. पण आपला जीव वाचावा म्हणून मी शांत बसले. त्यानंतर मी त्याला घरापासून २०० मीटर अंतरावर थांबायला सांगितलं. राइट संपल्यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅपवर अनेक कॉल आणि अश्लील मेसेज करायला सुरुवात केली होती."

मणिपूरमधील घटनेनं देशात संतापाची लाट उसळलेली असताना आता या घटनेनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT