Belgaum Accident Saam Tv
महाराष्ट्र

Belgaum Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जण ठार

पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Belgaum Accident News : बेळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भविकांचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले. (Latest Marathi News)

हे सर्व भाविक पिकअप वाहनातून प्रवास करत होते. रामदुर्ग तालुक्यातील चींचनुर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ हा अपघात घडला. वाहन झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. मृत व्यक्ती रामदुर्ग तालुक्यातील हुल कुंद गावाचे आहेत.

हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्राप्त माहितीनुसार, हे सर्व भाविक यल्लमा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिलं आणि गाडी थांबवली. त्याने भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असं सांगितलं. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि ६ जणांना आपला जीव गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळावर ३० कोटींचे कोकेन जप्त, DRI ची मोठी कारवाई

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले, नंतर...

Crime: बॉयफ्रेंडच्या मदतीने आईने घेतला पोटच्या मुलाचा जीव, हातपाय बांधून अमानुष मारहाण, नंतर...

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT