Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : एसटी गुन्हेगारीचा अड्डा बनली, महिलांची छेड काढली, नंतर नातेवाईकांनी बस फोडली

Beed Crime : सोलापूरवरुन बीडमध्ये येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर महिलांच्या नातेवाईकांनी बसवर दगडफेक केली. त्यानंतर बीडमध्ये बस सेवा ठप्प झाली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला काल मारहाण झाली. दहा-बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी शिवराजला मारहाण केली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये बसलेल्या महिलांची छेड काढण्यात आली. या महिलांनी त्यांच्या नातेवाईकांना फोनवर घटलेल्या प्रकाराची माहिती दिली. बीड शहरातील बार्शी नाका परिसरात ही बस दाखल होताच नातेवाईकांनी बसच्या समोरच्या बाजूला असलेल्या काचेवर दगडफेक सुरु केली. त्यांनी एसटी बसच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

एसटी बसवर झालेल्या दगडफेकीमुळे मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर बीड शहरात आहे त्याच ठिकाणी एसटी बसेस थांबवण्यात आल्या आहेत. बस स्थानकातील बस सेवा ठप्प झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात पेड बीड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु झाला आहे.

सोलापूरवरुन बीडमध्ये परत असलेली एसटी बसमध्ये बसलेल्या महिलांची छेड काढण्याची माहिती समोर आली. यानंतर महिलांच्या नातेवाईकांनी गर्दी करत त्या एसटी बसवर दगडफेक केली. संतप्त नातेवाईकांना बसच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीनंतर बीडमधील बस स्थानकातील बस सेवा ठप्प झाल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT