Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Beed News : बीडमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल व्हिडीओवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेला मारहाण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ बीडच्या केज तालुक्यातील एका गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. उसने पैसे न दिल्याने महिलेला मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याने चंद्रकला गदळे या महिलेला घरी जाऊन मारहाण झाली. केजमधील दहिफळ वडमाऊली गावातील सुशील गदळे यांनी डोईफोडवाडी येथील सतीश डोईफोडे याला ट्रक खरेदी करण्यासाठी उसनवारी पैसे दिले होते. सुशील गदळे यांनी दिलेले पैसे परत मागितले.

उसनवारी दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून सतीश डोईफोडेची पत्नी कालींदा डोईफोडेने दहिफळ वडमाऊली गावात जाऊन सुशील गदळे यांच्या आई चंद्रकला गदळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 'तुमचे घेतलेले पैसे आम्ही परत देणार नाही' असे म्हणत कालींदा डोईफोडेने चंद्रकला गदळे यांना मारहाण केली. या प्रकरणी कालींदा डोईफोडेच्या विरोधात केज पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये गुंडाराज

बीडमध्ये एका माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत, शेत रस्त्याच्या वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी माजी सरपंच याच्यावर कारवाई करत त्याला न्यायालयात हजर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Beed : सत्तेचा मलिदा मिळाल्यावर लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार; शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांचा आरोप

Pune Mhada Lottery: पुण्यात स्वस्तात मस्त घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Thalipeeth : कागदासारखं पातळ अन् मऊसूत गावरान चवीचं थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

Stale Rice Benefits: रात्रीचा शिळा भात फेकून देताय? थांबा... वाचा फायदे

SCROLL FOR NEXT