Saam TV News
महाराष्ट्र

Beed News: ढाकणेंना अमानूष मारहाण प्रकरण; आरोपी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल

Shirur Taluka Assault Case: ढाकणेंवर अमानूष मारहाण प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात एक अमानुष प्रकार घडला होता. सतीश भोसलेनं महेश आणि दिलीप ढाकणे या बाप लेकांना अमानूष मारहाण केली होती. याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी होत होती. अशातच सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण झाल्यानंतर महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसले भाजपचा पदाधिकारी असून, भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.

बीडमध्ये गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात एक अमानूष प्रकार घडला होता. सतीश भोसले या भाजप पदाधिकाऱ्यानं महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे या बाप लेकांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीत महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर, दिलीप ढाकणे यांचे ८ दात पडले आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

घटना घडल्यानंतर ढाकणे कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते आणि त्यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात व्हिडिओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती सतीश भोसलेच असल्याचं समोर आलंय. आरोपीच्या अटकेसाठी पुणे आणि अहिल्यानगर येथे पथक रवाना झाले आहेत. आज अखेर सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरण पकडण्यासाठी गेला होता. दिलीप आणि महेश या पिता पुत्राने सतीश यांना अडवल्यामुळे, रागाच्या भरात सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्याने मिळून दिलीप आणि महेश ढाकणे यांना मारहाण केली. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ ते नऊ दात पडले आहेत. तर, महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT