Vaibhav Chavan Death Case 
महाराष्ट्र

Beed : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभवचा मृतदेह आढळला, बीडमधील धक्कादायक घटना

Vaibhav Chavan Death Case : बीडमधील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाणचा मृतदेह इमामपूर शिवारात आढळला आहे. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस भरती झाल्याचे प्रकरण त्याने उघडकीस आणले होते.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed Fake Sports Certificate Scam : बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह इमामपूर शिवारात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणाऱ्यांचे मोठे रॅकेट वैभवने उघडकीस आणले होते. दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. घोटाळा समोर आल्यानंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या आणि धमकी देणाऱ्यांची नावे व ऑडिओ त्याने रेकॉर्ड करून ठेवले होते.

नेमके प्रकरण काय?

वैभव चव्हाण हा कराटे स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे होती. त्याने २०२४-२५ मध्ये धाराशिव पोलिस भरतीत खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. तो वेटिंग लिस्टमध्ये असताना, त्याच्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या नागनाथ विष्णू साबळे या उमेदवाराने बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली होती.

या प्रकाराचा पाठपुरावा करत वैभवने क्रीडा आयुक्तालय (बालेवाडी, पुणे) येथे तक्रार केली होती. त्याच्या या तक्रारीवरून राज्यातील बोगस खेळाडूंचे मोठे रॅकेट बाहेर आले. या प्रकरणी राज्यातील १४ पोलिस कर्मचाऱ्यांसह काही क्रीडा अधिकारीही निलंबित झाले होते. तसेच, बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिव यांना पुणे गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२६ मध्ये अटक केली होती.

जीवाला धोका असल्याची व्यक्त केली होती भीती

कारवाई झाल्यापासून वैभव चव्हाण याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याने आपल्या आणि मित्राच्या जीवितास धोका असल्याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्या मित्राला पाठवली होती; ज्यामध्ये माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल, असे त्याने म्हटले होते. गुरुवारी वैभवचा बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

दिवाळीत भयंकर अपघात, ७ जणांचा मृत्यू; स्कूटीच्या अपघातानंतर मदतीसाठी धावले अन् भरधाव ट्रकने जमावाला चिरडले

Bank Holiday : धनत्रयोदशी बँक बंद राहणार की सुरु? जाणून घ्या RBI चे महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Weather : ऑक्टोबर संपला तरी उन्हाळा पाठ सोडना! राज्यातील तापमानात वाढ, पहाटे हवेत गारवा; IMD चा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT