Beed Police Hafta Vasooli Viral Video विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime: पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकांकडून हप्ता वसुलीचा व्हिडिओ व्हायरल...

Corrupted Beed Police: या व्हिडिओ संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी उत्तर दिले.

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये पोलिसांचा हप्ते वसुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाबू पवार यांचा हा व्हिडिओ असून तो व्हिडिओ बीड (Beed) जिल्ह्यात चांगलाच व्हायरल (Viral Video) झालाय. एका रिक्षावाल्याकडून पवार हे पैसे घेत आहेत आणि ते एका कागदावर टिपून ठेवत असल्याचे त्यात दिसत आहे. "1 हजार रुपये दे आणखीन बऱ्याच जणांकडून गोळा करायचं आहेत" असं म्हणत पैशे खिशात घालताना देखील पवार हे दिसून येत आहे. कार्यकारी अभियंताच्या टक्केवारी घेणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चक्क आता पोलीस प्रशासनात कशा पद्धतीने हप्ते वसुली सुरु आहे, याचे उदाहरण समोर आले आहे. यामुळं बीड जिल्ह्यात चाललंय काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे देखील पहा -

माजलगाव शहरातील पॉइंटवरील रिक्षावाल्यांच्या माहितीनुसार, पोलीसांकडून रिक्षा चालकांना हप्ता वसुलीसाठी अव्वाच्या सव्वा रुपये मागण्यात येतात. त्यांचा त्रास असह्य झाल्यानेच हा व्हिडिओ रिक्षाचालकाने काढला आहे. पोलीसांच्या सुरु असलेल्या हप्ता वसुलीमुळे पोलीसांचा नैतिक धाकच संपून गेलेला आहे. व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस कशाप्रकारे वागत आहेत, याचा पुरावाच मिळालेला आहे. चार दिवसांपूर्वी हा व्हिडिओ माजलगावच्या रंगोली कॉर्नरवर शूट करण्यात आलेला आहे व्हिडिओतील पोलीस कर्मचारी बाबू पवार ज्या पध्दतीने हप्ता मागत आहेत, ती पध्दत पाहता पवार किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते. या व्हिडिओ संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारले असता दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी उत्तर दिले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT