Maharashtra Government  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक; राज्यातील २ रेल्वे मार्गाला ग्नीन सिग्नल, वाचा सविस्तर

Beed Railway : राज्य सरकारने राज्यातील २ रेल्वे मार्गाला हिरवा झेंडा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Saam Tv

बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी १७ सप्टेंबरपासून सुरु होणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला

बीड ते परळी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५०% हिस्सा

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे अनेक वर्षापासूनचे बीडमधील नागरिकांचं रेल्वेसेवेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी'.

'फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्टेशनच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात. या कामाला गती देऊन पुढील काळात रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही अजित पवारांनी दिले.

अहिल्यानगर - बीड - परळी रेल्वे मार्गाविषयी थोडेसे

अहिल्यानगर - बीड - परळ रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोठ्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२.

प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २४०२.५९ कोटी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

SCROLL FOR NEXT